हिंदू संघटनेच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीमार

हिंदू संघटनेच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीमार

कोल्हापुरात हिंदू संघटनांनी आंदोलन केले. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. औरंगजेबाचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. त्यांनी बुधवारी (दि. ७ जून) कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकांमध्ये एकच अफरातफर माजली. एक आंदोलक तर थेट पोलिसांच्या गाडीवर चढला. पोलिसांच्या लाठीमारामुळे गोंधळ उडाला.
कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नयेत यासाठी कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ‘विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ ‘मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या इसमांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.’, अशी स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
तसेच, ‘औरंग्याचे फोटो नाचवण्याची कोणाला अती हौस असेल तर त्याच्या फोटोच्या बाजूला फोटो लावून त्यावर हार चढवण्याची सोया आमच्याकडे आहे’, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे.
‘मविआ सत्तेत असताना अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत, कोल्हापुरातील घटनेसाठी गृहखाते आणि शिंदे- फडणवीस सरकार जबाबदार आहे’, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version