मातापित्यांनीच फेकलं बाळाला रेल्वे रुळांवर, पण…

मातापित्यांनीच फेकलं बाळाला रेल्वे रुळांवर, पण…

‘देव तारी त्याला कोण मारी’ या विधानाची प्रचिती देणारी घटना नुकतीच सोलापूर येथे घडली आहे. निर्दयी माता-पित्यांनी आपल्या एक महिन्याच्या गोंडस बाळाला गुरुवारी मध्यरात्री रुळावर फेकून दिलं. मात्र एका आरपीएफच्या जवानाने या बाळाचे प्राण वाचवले.

सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या दौंड रेल्वेस्थानकापासून अवघ्या अर्धा किलोमीटवर निर्दयी माता-पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवून रेल्वे खांबाजवळ फेकून दिलं होतं. आरपीएफचे जवान विनीतकुमार कुर्डुवाडी ते दौंड या मार्गावर ड्युटी करत होते. दौंड रेल्वेस्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता, त्या दिशेला जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला.

 

बाळ आढळून येताच विनीतकुमार यांनी ताबडतोब त्या बाळाला कुशीत घेतले. आपल्याला वाचवायला कोणीतरी आलं आहे. याची कल्पना त्या चिमुकल्या जीवालाही आली असावी. बाळाने काही क्षणांतच रडणं थांबवलं आणि विनीत कुमार यांच्या कुशीत शांत झोपलं. बाळाला उराशी घट्ट पकडत विनीतकुमारने तातडीने रुग्णालय गाठलं. बाळाची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

 

जन्मदात्या आई-वडिलांनाच आपलं मुल मरण्यासाठी सोडून दिलं असताना विनीत कुमार यांच्या रूपाने बाळाला देवानेच वाचवलं असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे. इतक्या लहानशा बाळाला मृत्यूच्या खाईत ढकलायला निघालेल्या आई- वडिलांचा छडा अजून लागलेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version