शालेय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड

शालेय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड

वृत्तसंस्था, रतलाम

पद्मावत‘ चित्रपट रीलिज करण्यास हिरवा कंदील मिळाला असलातरी वाद काही केल्या संपायच नाव घेत नाहीये. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी ‘पद्मावत‘ चित्रपटातील ‘घूमर‘ गाण्यावर डान्स केला. मात्र, यामुळे संतापलेल्या राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी शाळेची तोडफोड केली आहे. 

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जाओरामध्ये सेंट पॉल शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी लोअर केजीतील विद्यार्थ्यांनी ‘पद्मावतचित्रपटातील ‘घूमर‘ या गाण्यावर डान्स केला. याची माहिती मिळताच संतापलेल्या राजपूत करणी सेनेचे सदस्य शाळेत घुसलेत्यांनी म्युझिक सिस्टीम तोडलीप्लास्टिकच्या खुर्च्याही विद्यार्थी आणि पालकांवर भिरकावल्यानोटीस बोर्डाच्या दोन काचाही फोडल्याअसा दावा मुख्याध्यापकांनी केला.

सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळावरुन पळून जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. जवळपास 24 ते 25 जणांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत शिरकाव केला. त्यामुळे चिमुरडे विद्यार्थी आणि पालकांसह शिक्षकांमध्येही घबराट पसरली. 

एका विद्यार्थ्याने काही गाण्यांवर पॅरडी केली होती. त्यातील एक गाणं म्हणजे घूमर या गाण्यातील एक भाग होता. मात्र, आम्ही त्या विद्यार्थ्याला थांबवलं आणि ते गाणं न वाजवता पुढच्या गाण्यावर परफॉर्म करण्यास सांगितलं‘ असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं. दरम्यान, पद्मावत चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version