भातकुली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून युवा स्वाभिमान पक्षाला १७ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळला आहे. त्यामुळे आमदार रवी राणा हे शिवसेनेवर भारी पडले असून युवा स्वाभिमान पक्षाने भातकुली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे.
भातकुली नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. या १७ जागांपैकी ९ जागांवर युवा स्वाभिमान पक्षाला विजय मिळवला आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाची एकहाती सत्ता ही पुन्हा एकदा भातकुली नगरपंचायतीवर आली आहे.
भातकुली नगरपंचायतीमध्ये १७ जागांपैकी युवा स्वाभिमान पक्षाला ९ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ३ जागा, भाजपला २ जागा, अपक्षला २ जागा आणि काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भातकुलीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. मात्र भातकुली नगरपंचायतीमध्ये काँग्रेसाल केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भातकुली नगरपंचायतीमध्ये विकास कामे झाली असल्यामुले मतदारांनी पुन्हा एकदा युवा स्वाभिमान पक्षावर विश्वास दाखवला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.