Bhaskar Jadhav : "राजकीय मतभेद बाजूला सारून…" भास्कर जाधवांच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ; थेट शिंदेंना विनंती

ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Bhaskar Jadhav : "राजकीय मतभेद बाजूला सारून…" भास्कर जाधवांच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ; थेट शिंदेंना विनंती

"जगामध्ये अशी काही माणस आहेत जी आपल्याला वाटतात सर्वसामान्य माणसं म्हणून जन्माला येतात. वागायला सर्वसामान्य माणसं म्हणून आपल्यासारखी वाटत असतील. तरी ती माणसं आपल्यासारखे सर्वसामान्य माणसासारखं जन्म घेऊन जन्माला येत नाही. ते एक प्रकारचे अवतारी पुरुष असतात. जन्माला येताना ते काहीतरी अवतार कार्य म्हणून जन्माला येतात. कार्य पार पडल्यानंतर ते लोक यहलोकी जातात. त्यामध्ये आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता येईल छत्रपती संभाजी महाराजांचा नाव घेता येईल संत ज्ञानेश्वर यांचे नाव घेता येईल राम गणेश गडकरी चे नाव घेता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेता येईल. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडवलेली जी क्रांती आहे ते अवतारी पुरुष म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे… यांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे आठवणी अनेक आहेत. फक्त शब्दांमध्ये शब्दबद्ध करता येणार नाही. शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि आठवणींना उजाळा देणे हा एकमेव दिवस आहे".  

हेही वाचा- Nashik Mahapalika Mayor Aarakshan : तब्बल 26 वर्षानंतर महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव; 'या' महिलांची महापौरपदासाठी वर्णी

"आज बाळासाहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. बाळासाहेबांचे कार्य या पिढी समोर ठेवण्याचा दिवस आहे.राज ठाकरेंनी काय राजकीय भाष्य केली ते बोलण्याचा आजचा दिवस नाही. माझ्या मनामध्ये प्रचंड प्रचंड प्रचंड दुःख आहे. हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे आणि यावर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई पालिकेवर असणार नाही याच्यासारखा दुःख नाही. जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात जे बाळासाहेबांचे वारसदार म्हणून सांगतात त्या त्यांना आव्हान वजा विनंती करतो. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. बाळासाहेबांबद्दल श्रद्धा आहे का त्यांचा तुमच्यावर विश्वास होता का बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? साहेबांना श्रद्धांजली अर्पित करू इच्छिता का? म्हणून आज तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं पाहिजे."

भास्कर जाधवांची थेट शिंदेंना साद
"ज्या भाजपा शिवसेना बरोबर एकनाथराव शिंदे आहेत त्या एकनाथ शिंदेंना आव्हान कमी विनंती करतो तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे केंद्रामध्ये तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आम्ही तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्रात तुमच्या सरकारला पाठींबा दिला तुमच्या सोबत राहू. हे वर्ष हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आणि मुंबईवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे. आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचा धाडस एकनाथराव  शिंदे यांनी केला पाहिजे. 100% एकमेक शिंदे यांनी पाठिंबा दिला पाहिजे. तो घेण न घेणं पण त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये. महापौर करण्यासाठी एकनाथरावांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे. जर बाळासाहेबांना म्हणत असेल तर एकनाथ शिंदेने धातृत्व मानायला पाहिजे. तुम्ही भाजपाच्या नादाला लागून शिवसेना तोडून मोडून घेऊन गेलात. शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण मालक आहेत ते… भगवान के घर देर है अंधेर नही." 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version