Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! चालकाच्या एका चुकीमुळे कार थेट 30 फूट दरीत कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी कार वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ तब्बल 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळली.
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! चालकाच्या एका चुकीमुळे कार थेट 30 फूट दरीत कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी कार वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ तब्बल 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात संजय जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढून चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Bandra Demolition: वांद्र्यातील अतिक्रमणावर तोडक कारवाई! बाटल्या आणि दगड फेक करत कारवाईला विरोध; पोलिसांकडून लाठीचार्ज

तर दुसरीकडे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्कोडा गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या लेन वर हा अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून घटनास्थळी आयआरबी यंत्रणा, पोलीस व ऍम्ब्युलन्स दाखल झाले. गाडीत मध्ये एकूण 3 जण होते.

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडर ला जाऊन धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीमध्ये घुसल्याने गाडीत असलेले 2 जण जागीच ठार झाले. गाडीचे दरवाजे व पत्रा कापून  गंभीर जखमी व मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version