बुलढाणा येथील येथील समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. परंतु हा अपघात टायर फुटल्याने झाला नसून बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचे समोर आले आहे.
सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक हि बस एका खांबावर जाऊन आदळली याबाबत ड्रायव्हरला विचारले असता टायर फुटल्यानं बस जाऊन आदळल्याचे त्याने सांगितले. मात्र हा अपघात तयार फुटल्याने झाला नसून चालकाला डुलकी लागून नियंत्रण सुटले आणि दुर्घटनाग्रस्त बस लोखंडी पोलवर आदळली. त्यामुळे दुभाजकाला धडक लागल्याने अपघात झाला. असा अहवाल समृद्धीवरील अपघाताबाबत अमरावती परिवहन विभागाने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.