बीड : 'नीट यूजी 2026'चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. बीडच्या वडवणीतील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनी पेपर सोडल्यानंतर तिने घरी येतात पाहिले असता 720 पैकी तब्बल 702 गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र मिळालेल्या ओएमआर शीट चुकीची असल्याचा दावा तिने केला आहे. तिचे प्रत्यक्ष स्कोर कार्ड पाहिले असता 87 गुण मिळाले आहेत. यात माझ्याकडे प्रश्नपत्रिका पुरावा असल्याचा दावा देखील तिने केला आहे. तर मुलीचा लागलेला हा निकाल पाहून पवार कुटुंब अनपेक्षित निकालामुळे धक्क्यामध्ये आहे. एवढी मेहनत घेऊन नीट परीक्षा मधील गोंधळ आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करेल या भीतीने ज्ञानेश्वरीच्या आईला अश्रू अनावर झाले. तर ज्ञानेश्वरी धक्क्यामध्ये होती तिला कसं सावरलं, हे आम्हाला माहित, असं तिच्या आईने सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.