शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

महाविकास आघडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहयला मिळत आहे. विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत असून अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी सायंकाळी ५ वाजता बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत नवाब मलिकांचा राजीनामा तसेच राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यकारी अध्यक्षपदाची नियुक्ती यावर चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाली असल्याचेही समजत आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे बैठिकीला उपस्थित आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version