अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी धनुष्यबाणावर नवीन दावा केला आहे.
अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक १२ जानेवारी, २०२३ रोजी या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यादरम्यान बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षाचे आधीचे चिन्ह असणाऱ्या ‘धनुष्यबाणावर’ वादातीत वक्तव्य केले आहे.
‘येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर चालणाऱ्या एकनाथ शिंदेंनाच मिळणार, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.