दुहेरी हत्याकांडने नागपूर हादरले; पत्रकाराच्या आई-मुलीचे अपहरण करुन निर्घृण हत्या

दुहेरी हत्याकांडने नागपूर हादरले; पत्रकाराच्या आई-मुलीचे अपहरण करुन निर्घृण हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

सध्याचे क्राईम कॅपिटल बनलेल्या नागपुरात हत्येचे सत्र सुरुच आहे. नागपुरात चक्क पत्रकाराच्या आई आणि मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. नागपुरचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि मुलीचे अपहरण करुन खून करण्यात आला आहे. रविकांत कांबळे नागपुरमध्ये एक न्यूज पोर्टल चालवतात. शनिवारी सायंकाळपासून आई आणि मुलगी बेपत्ता झाल्या होत्या.

अखेर नागपूर-उमरेड रस्त्यावर आई उषा कांबळे आणि मुलगी राशी कांबळे यांचे मृतदेह आढळून आले. एका गोणूत भरुन जवळच्या नाल्यात त्यांचे मृतदेह फेकण्यात आले होते. या दुहेरी हत्याकांडमुळे संपूर्ण नागपूर परिसर हादरले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version