विनामास्क फिरणाऱ्याकंडून पालिकेची दंड वसुली जोमात

विनामास्क फिरणाऱ्याकंडून पालिकेची दंड वसुली जोमात

ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिका सतर्क झाली आहेत. मुंबईत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा वेग मुंबई महापालिकेने वाढविला आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मुंबई महापालिका दरदिवशी लाखो रुपायांची वसुली करत आहे. तसेच ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता ‘सावध राहा, मास्क घाला’, असे आवाहन महापालिकेकडून मुंबईकरांना करण्यात येत आहे.

कोरोना परिस्थिती स्थिरावल्यामुळे तसेच लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे मुंबईकर बेफिकिर झाले आहेत. कोरोना आजाराचे गांभीर्य नसलेल्या व्यक्ती सर्रासपणे विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिकेचे क्लिनअप मार्शल कारवाई करत आहेत.

ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ

देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ झाली असून देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ७ ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईतही रुग्णसंख्येत वाढ झाली असून ३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण आढळले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version