धुळवडी दिवशी, मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर, पोलिसांची कारवाई

धुळवडी दिवशी, मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर, पोलिसांची कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांमुळेच, वाहनांच्या अपघातात वाढ झाल्याचे आढळून येते. मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर नेहमीच वाहतूक पोलिसांची करडी नजर असते. शुक्रवारी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी तब्बल 348 दारूड्या चालकांना पकडलं.

रंगपंचमी सारख्या सणांना दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यातच एखादा अपघात झाला तर सणाला तर गालबोट लागतचं, पण पोलिसांनवर देखील प्रश्नचिन्ह उद्भवतात, म्हणून अश्या सगळ्या दिवशी दारुच्या नशेत तर्र, गाडी चालवणाऱ्यां विरोधात मोहीमच राबवली.
यावेळी दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांसोबतच, विनाहेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्या, तब्बल 1271 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. सोबतच ट्रिपल सिट बाईक चालवणाऱ्या 174 जणांना पोलिसांनी पकडले. विनापरवाना गाडी चालवणाऱ्यां 17 चालकांनवर देखील यावेळी पोलिसांनी कारवाई केली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version