ऐतिहासिक एल्फिस्टन स्थानकाच्या नावात बदल…

ऐतिहासिक एल्फिस्टन स्थानकाच्या नावात बदल…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ऐतिहासिक एलफिस्टन स्थानकाचं नाव गुरुवारपासून प्रभादेवी करण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वेत आता प्रवाशांना पुढील स्थानक प्रभादेवी अशी सूचना ऐकायला मिळणार आहे.

त्यामुळे अनेक चांगल्या वाईट आठवणीचं स्थानकाचं हे नाव इतिहासजमा झालं आहे. ब्रिटीश अधिकारी जॉन एलफिस्टन यांच्या नावावरून या स्थानकाला एलफिस्टन नाव देण्यात आलं होत. मात्र आता हे नाव इतिहासजमा झालं असून याचे नामांतंर आता प्रभादेवी स्थानक असे झाले आहे.

एलफिस्टन रोड स्थानकाचं नामांतर प्रभादेवी झाले आहे मात्र या नामकरणावरून आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे.

राहुल शेवाळे आणि दिवाकर रावते यांच्यात हा श्रेयवाद सुरू असून एलफिस्टनचे नामकरण प्रभादेवी व्हावे असा पाठपुरावा मी गेले 27 वर्ष करतोय असं परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं म्हणणं आहे.

तर 2 वर्षापुर्वी घेतलेल्या पुढाकारामुळे एलफिस्टन स्थानकाचं नाव बदलण्यात आलं आहे असं राहूल शेवाळेंचं म्हणणं आहे.

एलफिस्टन रोड स्थानकाचं नामांतर प्रभादेवी

  • ऐतिहासिक एलफिस्टन स्थानकाचं नाव गुरुवारपासून प्रभादेवी करण्यात आलं आहे.
  • ब्रिटीश अधिकारी जॉन एल्फिन्स्टन यांच्या नावावरून या स्थानकाला एल्फिन्स्टन नाव देण्यात आलं होत.
  • स्थानकाच्या नामांतंरावरून दिवाकर रावते आणि राहूल शेवाळें यांच्यात श्रेयवादाला सुरुवात
  • स्थानकाचे एलफिस्टन हे नाव आता इतिहासजमा झालं आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version