राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईडी कार्यालयासमोर आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईडी कार्यालयासमोर आंदोलन

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पहाटेपासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे ईडी कार्यालयाबाहेर मलिक समर्थकांची गर्दी झाली असून कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक आक्रमक झाले असून आंदोलन करत होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना कार्यालयाच्या थोड्या अंतरावर असताना थांबवले. तसेच त्यांना ईडीच्या परिसरात जाऊ दिले नाही. यावेळी राष्ट्रवादी युवा वर्गाने भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू

दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर यांच्याशी संबंधित नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू आहे. तसेच याप्रकरणी चौकशीसाठी नवाब मलिक यांना ईडीने समन्स बजावले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version