गुजराती पाट्यांना मनसे दणका; वसई-विरारमध्ये मनसैनिक आक्रमक

गुजराती पाट्यांना मनसे दणका; वसई-विरारमध्ये मनसैनिक आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसे वसई-विरारमध्ये आक्रमक झाल्याची पाहायला मिळाली.हॉटेल, रेस्टॉरेन्टची नावं ही गुजराती भाषेत असल्याचे पाहायला मिळताच मनसेने मराठी पाट्यांचा हट्ट धरलाय.

यावेळी मनसेने हॉटेल मालकांना निवेदन देऊन गुजराती भाषेच्या पाट्या मराठीत करण्यास सांगितले.

दिलेल्या वेळेत पाट्या मराठी भाषेत झाल्या नाही तर, मनसे आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल, असा इशाराही महाराष्ट्र सैनिकांनी दिलाय.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8वर असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरेन्टवर गुजराती भाषेच्या पाट्या असून या त्वरीत हटवून तेथे मराठी भाषेच्या पाट्या कराव्या, अशी मागणी यावेळी कऱण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version