घर विक्रीसाठी म्हाडाची ‘बुक माय होम’ ही नवी शक्कल

कोकण म्हाडाच्या 13 हजार रिकाम्या घरांसाठी ‘बुक माय होम’ योजना सुरू; ग्राहकांना घर थेट निवडून बुक करता येणार, मागील सोडतींना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नवे पाऊल.
घर विक्रीसाठी म्हाडाची ‘बुक माय होम’ ही नवी शक्कल

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या विरार- बोळिंज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली या ठिकाणी बांधलेली घरे विक्रीअभावी रिकामीच पडली होती. ही घरे विकण्यासाठी वेळोवेळी सोडती आयोजित करण्यात आल्या, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी, 13 हजारांहून अधिक घरे अद्यापही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हीच अडचण लक्षात घेऊन म्हाडाने आता ‘बुक माय होम’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. ‘बुक माय शो’च्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांना हवे असलेले घर निवडण्याचा आणि थेट बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

हेही वाचा: 'आमचं आयुष्य संपत आलं आहे पण…….' किल्लारी येथील कामगारांचे आत्मदहन आंदोलन

या व्यासपीठावर इच्छुकांना सर्व रिक्त घरे नकाशासह दाखवण्यात येणार आहेत. घराची किंमत, परिसरातील सुविधा, आणि इतर तपशील दिले जातील. ग्राहकांना घर निवडून थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि ‘प्रथम नोंद, प्रथम विक्री’ या तत्वावर राबवण्यात येणार आहे.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मते, या नव्या संकल्पनेमुळे विक्री वाढेल आणि नागरिकांना हवे ते घर निवडण्याचा अधिक मोकळा पर्याय मिळेल. विशेष म्हणजे, इच्छुकांना सोडतीची वाट पाहावी लागणार नाही.

‘बुक माय होम’ हा उपक्रम सध्या कोकण मंडळापुरता मर्यादित असला, तरी यश मिळाल्यास राज्यभर राबवला जाऊ शकतो. त्यामुळे कमी किमतीत घर शोधणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरू शकते.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version