टॅक्सी चालवत असताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन्…

टॅक्सी चालवत असताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील माहिममध्ये टॅक्सी चालवताना चालकाला ह्रदविकाराचा झटका आल्याने टॅक्सीचा अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  या घटनेत 4 जण जखमी झाले असून चालकाचा मृत्यू झाला आहे.

माहिममधील पॅराडाइज सिनेमागृहाजवळ बुधवारी रात्री विचित्र अपघात झाला. टॅक्सी चालवत असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला.

यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि टॅक्सी फुटपाथवर चढली. या घटनेत चार जण जखमी झाले. तर टॅक्सीचालकाचा मृत्यू झाला असून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेतील जखमींचे आणि मृत्यू झालेल्या टॅक्सीचालकाचे नाव समजू शकलेले नाही.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version