Ramdas Kadam On Uddhav Thackeray : ‘बाळासाहेब ठाकरेंचा आधीच मृत्यू, मृतदेह घरात ठेवून…’, रामदास कदम यांचा मोठा खुलासा

माजी मंत्री रामदास कदम यांनीही भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले. 
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : ‘बाळासाहेब ठाकरेंचा आधीच मृत्यू, मृतदेह घरात ठेवून…’, रामदास कदम यांचा मोठा खुलासा

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडा. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आले होते.त्यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनीही भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले. 

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर काही विधानं केली. ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे.मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. मी हे फार मोठं विधान करतो आहे,’ असे रामदास कदम आपल्या भाषणात म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? 

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रि‍पदाचा हव्यास होता. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली. पण सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version