Pawan Raje Nimbalkar Murder Case: पाठलाग करून रस्त्यातच घातल्या गोळ्या; 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज लागणार निकाल

Pawan Raje Nimbalkar Murder Case:  पाठलाग करून रस्त्यातच घातल्या गोळ्या; 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज लागणार निकाल

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या चर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता आहे. धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील असलेले पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येला तब्बल 20 वर्षे पूर्ण झाली असून, आज या प्रकरणाचा अंतिम उलगडा होण्याची अपेक्षा आहे. 

या हाय-प्रोफाईल हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने आपल्या तपासात धक्कादायक खुलासे केले. राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वैराचा वचपा काढण्यासाठी आपले चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा सीबीआयने केला.  या संपूर्ण खटल्यात एकूण 9 जणांना आरोपी करण्यात आले असून आज न्यायालय या सर्वांवर आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version