Mhada : म्हाडाच्या योजनेवर तांत्रिक अडचणींचे सावट, अलिशान घरांबद्दल मोठी अपडेट समोर

तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
Mhada : म्हाडाच्या योजनेवर तांत्रिक अडचणींचे सावट, अलिशान घरांबद्दल मोठी अपडेट समोर

मुंबईमध्ये स्वत:चं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. हे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होत असतं. यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार होती, पण तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, घरांची सविस्तर माहिती असलेली ब्रोशर आणि अर्ज नोंदणीची लिंक काल उपलब्ध होणार होती. मात्र, म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया वेळेत सुरू होऊ शकली नाही. परिणामी, म्हाडा प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिका इतकी असंवेदनशील? अजित पवारांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच… 

अनेक इच्छुकांनी सकाळी 11 वाजता वेबसाइटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, पण तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज भरता आला नाही.  दरम्याने म्हाडाने अधिकृत निवेदनात सांगितले आहे की, तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरच नवीन तारीख, वेळ आणि सविस्तर माहिती पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. 

हेही वाचा – Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam : कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात कलह

जो प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही योजना चालते. म्हणजेच, जो अर्जदार सर्वांत आधी योग्य अर्ज सादर करेल आणि पेमेंट पूर्ण करेल, त्याला घर मिळण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या लॉटरीत न विकले गेलेली ही घरे आता या पद्धतीने विक्रीसाठी ठेवली आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version