Monsoon Update: राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग; पुणे, साताऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी…

हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, येत्या काही दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
Monsoon Update: राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग; पुणे, साताऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी…

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाडा वाढला होता. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, येत्या काही दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज पुणे, सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, 20 जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. रायगडमधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. रायगड जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर उघडीप झाली होती. अखेर आज उत्तर रायगडसह दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. 

मुंबई महानगर प्रदेश, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पावसाचा जोर वाढल्याने वातावरणातील उष्णता कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सखल भागांमध्ये पाणी साचणे, घाट विभागात दृश्यमानता कमी होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठीही हा पाऊस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या ताज्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version