राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे . देवेंद्र फडणवीस म्हणाले होते एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल आता म्हणाले अजित पवार आल्यावर फायदा होईल तर परत दोन महिन्यांनी म्हणतील आपला बेस निघून गेला असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे. तसेच जर एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवारना फोडण्याची गरज नव्हती असा टोमनाही जाणकार याना लगावला आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष देशात आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. लोकसभेच्या ५४३ जागा आम्ही लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळत चालली असून काही राज्यांमध्ये विजय देखील मिळेल तर स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून निवडणूक लढणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.
पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आहेत मात्र राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय करायचं ते तेव्हा मी ठरवेल आता मी फक्त दिल्या घरी सुखी रहा असेच म्हणेल मात्र जेव्हा पंकजा मुंडे यांना त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन मी तिला आणायला जाईल असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अहमदनगर येथे बोलताना केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.