इंडोनेशिया भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले आहे. रविवारी रात्री इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामध्ये जीवितहानी झाली असून आतापर्यंत 82 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर 100हून अधिक जण जखमी आहेत.
या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे त्सुनामी लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.