किरण गोसावीला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

किरण गोसावीला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

  किरण गोसावीला पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याबाबत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे मंगळवारी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी बुधवारी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गुन्ह्याबाबत पोलीसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतले. आणि गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच गोसावी विरोधात पुण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी किरण गोसावी यांचा एक क्लिप व्हायरल झाला होता. या क्लिपमध्ये किरण गोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी लखनऊला जाऊन त्याला अटक करत न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून किरण गोसावीला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version