भांडणाच्या रागातून मित्राचा खून

भांडणाच्या रागातून मित्राचा खून

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावची येथील ओंकार रकटे,वय २३ वर्ष या तरुणाचा अपहरण करून खून करत त्याचा मृतदेह जाळून,हाडे नदीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे ओंकार याच्या मित्रांनीचे हा खून केल्याची बाब समोर आली आहे,या प्रकरणी अष्ट पोलिसांनी सम्मेद सावळवाडे,भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशा तिघा मित्रांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे याच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात निर्माण झाला होता, यातून सम्मेदने आपल्या मित्रांसमवेत ओंकार रकटे याचे अपहरण केलं होतं, त्यानंतर ओंकार याला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला.

खुनाच्या घटनेनंतर ओंकार याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला, त्यानंतर त्याच्या मृतदेहाची राख आणि हाडे, ही पोत्यात भरून कृष्णा नदीमध्ये टाकून देण्यात आली होती,अशी कबुली तिघा संशयित मित्रांनी दिली असून याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात तिघांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version