Nashik Heavy Rain Alert : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! भूकंपाच्या धक्क्यांनंतर आता अतिवृष्टीचा धोका; जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांना हाय अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) 31 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात व घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
Nashik Heavy Rain Alert : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! भूकंपाच्या धक्क्यांनंतर आता अतिवृष्टीचा धोका; जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांना हाय अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) 31 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात व घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. यादरम्यान संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

याचपार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने व कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासोबत बैठक घेत सर्व यंत्रणांना सतर्क राहून आपत्कालीन नियोजन पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यावेळी पूर नियंत्रण कक्षाला धरणांतील पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून वेळेवर नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तर कमी उंचीच्या पूलांवर पाणी वाढल्यास तातडीने वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. 

हेही वाचा- Weather Update : पुढील 2 दिवस सावधान! महाराष्ट्रात आभाळ फाटणार? 21 जिल्ह्यांना हाय अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहर व ग्रामीण भागातील नाले, सांडपाणी वाहिन्यांतील प्लास्टिक व अडथळे तातडीने हटवण्याचे आदेश देत, प्रत्येक तालुक्यात JCB, पोकलेन, सक्शन पंप, महावितरणची ब्रेकडाउन वाहने, तांत्रिक मनुष्यबळ व बचाव पथके 24 तास सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यावेळी 4 ऑगस्टपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या गरोदर महिलांना पूर्वनियोजन करून सुरक्षित रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर धोकादायक इमारतींतील नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासोबतच दरडप्रवण भागांवर सतत देखरेख ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना देखील यावेळी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यादरम्यान अलीकडे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version