टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३४१ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून ३४० धावा केल्या.
केएल राहुलने अखेरच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जीवावर टीम इंडियाला ३४० पर्यंत मजल मारता आली.
टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. धवनने ९६ धावांची खेळी केली. अवघ्या ४ धावांसाठी धवनचे शतक हुकले.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियााला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली.
पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी ८१ धावांची पार्टनरशीप केली. ही जोडी तोडायला एडम झॅम्पाला यश आले.
झॅम्पाने हिटमॅन रोहित शर्माला ४२ रनवर एलबीडबल्यू केले. यानंतर वनडाऊन आलेल्या कॅप्टन विराट कोहलीने धवनच्या सोबतीने टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
धवन-कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी १०३ रन्सची पार्टनरशीप केली. टीम इंडियालान धवनच्या रुपात दुसरा झटका लागला. धवन ९६ धावावंर बाद झाला.
टीम इंडियाचा १८४ स्कोअर असताना दुसरा झटका लागला.
यानंतर ५ ओव्हरनंतर इंडियाला तिसरा झटका लागला. श्रेयस अय्यर ७ धावा करुन माघारी परतला.
कोहली आणि लोकेश राहुल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या.
अखेरच्या काही ओव्हरमध्ये लोकेश राहुलने स्फोटक खेळी केली.
टीम इंडियाकडून धवनने ९६, केएल राहुलने ८०, कॅप्टन कोहलीने ७८ तर रोहित शर्माने ४२ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर केन रिचर्डसनने २ विकेट घेतल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.