एशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात…

एशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात…

वृत्तसंस्था, जकार्ता

एशियन गेम्स 2018 स्पर्धे मध्ये भारताने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे.

नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने कांस्य पदकाची कमाई केली आहे.

या भारतीय जोडीने फायनलमध्ये 429.9 चा स्कोअर केला आहे. भारताला रजत पदक मिळण्याची शक्यता होती, मात्र मागे पडलेल्या चीनने यशस्वी पुनरागमन केल्यामुळे भारताला कांस्य पदक मिळाले

चिनी तैपेईच्या जोडीने 494.1 गुण मिळवून सुवर्ण पदक जिंकले.

28 वर्षीय रवी कुमारने 2014 च्या एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तसंच यावर्षी कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने कांस्य पदकाची कमाई केली होती.

अपूर्वी चंदेलानेही 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version