विलेपार्लेतील विहिरीत 3 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विजय पांडे, दिव्या आणि रेणू यादव या तिघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.
दीक्षित रोडवरील विहिरीचा कठडा तुटल्यानं ही दुर्देवी घटना घडली आहे.
रुईया बंगला अशा खाजगी ठिकाणी ही विहिर आहे, धार्मिक विधीसाठी या विहिरीवर या महिला जमल्या होत्या.
विहिर जुनी असल्यामुळे स्लॅब तुटून या महिला विहिरीत पडल्या, या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आतापर्यंत 7 ते 8 महिलांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
कशी घडली घटना
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.