Gold – Silver Rate : सोने-चांदीचे दर कडाडले! 24 तासांत सोनं 2,530 तर चांदी 4 हजारांनी महाग; ग्राहकांमध्ये चिंता

Gold – Silver Rate : सोने-चांदीचे दर कडाडले! 24 तासांत सोनं 2,530 तर चांदी 4 हजारांनी महाग; ग्राहकांमध्ये चिंता

जुगल पाटील, प्रतिनिधी 

जळगाव : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी अक्षरशः विक्रमी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, वाढती मागणी, सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये होणारे बदल यामुळे मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 13 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या 24 तासांत सोन्याचा दर 2 हजार 530 रुपयांनी, तर चांदीचा दर तब्बल 4 हजार 50 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असून, सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. जळगावमधील आजचे दर सोनं (GST सह) 1 लाख 56 हजार प्रति 10 ग्रॅम तर चांदी दोन लाख 42 हजार प्रति किलो आहे.

हेही वाचा : Shiv Sena Corporator Resignation : शिवसेनेला धक्का! नवी मुंबईच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द; लवकरच शिंदेंनाही भेटणार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला मिळणारी वाढती मागणी, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाणे आणि बाजारातील मागणी-पुरवठ्यातील बदल यामुळे दरांवर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या दरात अशीच तेजी कायम राहिल्यास आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे, अशी माहिती सुवर्णव्यवसायिक गिरीष डेरे यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version