‘अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’ च्या सहकार्याने मुंबईत एनईबी स्पोर्ट्सतर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी तब्बल 1600 हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी येथे या इव्हेण्टचं आयोजन करण्यात आलं होतं.
ट्रेन पकडण्यासाठी रोज धावणारे मुंबईकर या मॅरेथॉनच्या निमित्ताने व्यायामासाठी, स्वतःच्या आनंदासाठी तसंच सामाजिक कार्यासाठीही धावण्याची संधी मिळाली.
‘आयडीबीआय मॅरेथॉन’ बीकेसी येथील जिओ गार्डन्स,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आली होती.
यात 5 किमी फन रन, 10 किमी टाइम रन आणि 21 किमीची अर्ध मॅरेथॉन अशा विविध कॅटेगरीज होत्या.
मॅरेथॉनमध्ये आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड अॅम्बेसेडर ही उपस्थित होते.
मॅरेथॉनमधील विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं ते मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले, स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.