वृत्तसंस्था, नवी मुंबई
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सुरुवात झाली आहे. एकूण 93 जागांसाठी निवडणूक लढवत असलेल्या 851 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.
‘आज गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतय मी सर्व मतदारांना मतदान करण्याची विनंती करतो मोठया संख्येने मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवाला समृद्ध करा’. अशा प्रकारचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानकर्त्यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.