‘इसरो’ कडून संपूर्ण जगाला खुश खबर

‘इसरो’ कडून संपूर्ण जगाला खुश खबर

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इसरो’नं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर इसरोने एका आठवड्यानंतर संपूर्ण जगाला एक मोठी खुश खबर दिली आहे. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हरने बाहेर येत संशोधनाला सुरूवात केली आहे. चांद्रयान-३ मोहिमेत भारताला मोठं यश हाती आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळून आली आहेत. इसरोने ट्विटरवरुन ही माहिती जगाला दिला.

‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी ( एलआयबीएस ) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे. ‘प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर ( एस ) असल्याचं आढळून आलं. तर, हायड्रोजनचा शोध घेतला जात असल्याचं ‘इसरो’नं सांगितलं आहे.

‘इसरो’नं ट्वीट करत सांगितलं की, “रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सल्फर ( एस ) आढळून आलं. अल्युमिनियम ( एआय ), सल्फर ( एस ), कॅल्शियम ( सीए ), लोखंड ( एफई ), क्रोमियम ( सीआर ), टाइटैनियम ( टीआय ), मँगनीज ( एमएन ), सिलिकॉन आणि ऑक्सिजन ( ओ ) आढळलं आहे. तर, प्रज्ञान रोवरकडून चंद्राच्या भूपृष्ठावर हायड्रोजनचा शोध सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version