जय महाराष्ट्र न्यूज, पूणे
पर्यटकांसाठी सर्वात आवडतं पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. लोणावळा हे मुंबईकर आणि पुणेकर पर्यटकांसाठी जवळचं आणि हक्काचं पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात लोणावळ्याकडे पर्यटकांचे पाय ओढावतात. मात्र लोणावळ्याचं आकर्षण असलेलं भुशी धरण आता भरभरून वाहत आहे.
शुक्रवारपासूनच पावसाने जोर धरला होता. गेली चार दिवस झालेल्या पावसामुळे आज अखेर पाणी ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे.
पर्यटक याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
भुशी धरणावर जाण्याचा विकेंड प्लान करताय तर आधी ही बातमी वाचा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.