Gold-Silver Rate : ट्रम्प आणि मोदींच्या कॉलने बाजाराचे चित्र पालटले; सोन्यात मोठी घट, जाणून घ्या आजचे दर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील एका महत्त्वपूर्ण फोन कॉलने बाजाराचे चित्रच पालटवून टाकले आहे. सोमवारी सोन्यात 9 हजार 800 रुपयांची घट पाहायला मिळाली आज....
Gold-Silver Rate : ट्रम्प आणि मोदींच्या कॉलने बाजाराचे चित्र पालटले; सोन्यात मोठी घट, जाणून घ्या आजचे दर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील एका महत्त्वपूर्ण फोन कॉलने बाजाराचे चित्रच पालटवून टाकले आहे. ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्कात (Tariff) कपात करून ते 18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची घोषणा केली आणि दलाल स्ट्रीटवर उत्साहाचे वारे वाहू लागले. सोमवारी चांदीत 53 हजारांची घट होऊन चांदी दोन लाख 50 हजारांवर पोहोचली. 

हेही वाचा- Share Market Today: ट्रम्प यांचा 'कॉल' आणि मार्केटमध्ये 'हल्लाबोल'; ट्रम्प यांच्या एका सहीने भारतीय गुंतवणूकदारांची 'दिवाळी'

सोमवारी सोन्यात 9 हजार 800 रुपयांची घट पाहायला मिळाली त्यानंतर आज 3 फेब्रुवारी 2026 रोजी, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट अंदाजे 1,56,967 इतके आणि चांदीचा दर प्रति किलो अंदाजे 2,89,520 च्या आसपास आहेत. 22 कॅरेट सोने 1,39,000 ते 1,44,000 च्या घरात असून सराफा बाजार आणि दुकामांनुसार थोडे बदलू शकतात. दरम्यान प्रमुख शहरांमधील मुंबई प्रति 10 ग्रॅमनुसार, 24 कॅरेट सोने 1,56,967 इतके तर 22 कॅरेट 1,44,300 च्या आसपास आहे. तसेच चांदी 2,89,520 प्रति किलो आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅमनुसार,  24 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,65,795 1 तोळा इतके आहे. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार, 24 कॅरेट सोने अंदाजे 1,46,370  ते 1,60,710 इतके आहे. नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार, 24 कॅरेट सोने अंदाजे 1,44,150 ते 2,02,266 इतके आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version