Gold – Silver Price : ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात अडीच हजार तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ

Gold – Silver Price : ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात अडीच हजार तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ

जळगाव : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीला पूर्णविराम लागल्यानंतर सोने व चांदीच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र आज, शनिवारी पुन्हा सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच मोठे गुंतवणूकदार आता पुन्हा सोने व चांदीकडे गुंतवणूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून आगामी काळात सोने व चांदीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सोने व्यापारातील तज्ञांनी वर्तवली आहे. आजचा सोन्याचा दर हा जीएसटीसह एक लाख 48 हजार रुपये असून चांदीचा दर जीएसटीसह दोन लाख 35 हजार रुपये इतका आहे. 

हेही वाचा : Government Hospital: सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाला की मिळणार 1 ग्रॅम सोन्याची अंगठी! राज्य सरकारची भन्नाट योजना

27 जून रोजी मुंबईतील सोन्याचे दर भारतातील एकूण सोन्याच्या दरांशी सुसंगत असल्याचे दिसून आले. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,44,300 रुपये आहेत. त्याचवेळी, 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,32,275 रुपये आहेत. दुसरीकडे, 18 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,08,225 रुपये राहिले आहेत. तर मुंबईत '999 फाइन' चांदीचे दर प्रति किलो 2,22,850 रुपये राहिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version