जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नालासोपा-यातील चिमुरडीच्या हत्येचे गूढ उकललंय. वडिलांच्या प्रेयसीनेच चिमुरडीची हत्या केल्याचे उघड झालयं. मृत अंजलीचे वडिल संतोष आणि आरोपी अनिता यांचे 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संतोषने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते, पण ते तो पूर्ण करत नव्हता, मात्र त्याने तिचे दोन गर्भपात केले.
संतोष आपल्याला फसवत असल्याचा राग लक्षात घेऊन त्याला धडा शिकविण्यासाठी तिने त्याची मुलगी अंजलीचे अपहरण केले आणि नवसारी येथे जाऊन तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर अनिता घरी परत आली आणि काहीच घडल नाही, असे भासवत तेथे वावरत होती, पण तिची संशयास्पद हालचाल मोबाईलचा सीडीआर आणि बातमीदारांकडून मिळालेली माहिती याआधारे पोलिसांनी तिला अटक केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.