गणपतीच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. मुंबई-पुण्यातून चाकरमान्यांची पावलं आता कोकणाकडे वळली आहेत. कोकणात जाण्यासाठी रेल्वे, बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शनिवार 23ऑगस्ट 2025 पासून चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी हजारोंच्या आसपास एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले होते. त्यातील काही बसेस सोडण्यात आल्या असल्याने महामार्गावर गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव, लोणारेजवळील परिसरात सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोलमाफी दिली आहे.
त्याचप्रमाणे प्रशासनाने गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 600 पेक्षा अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी तैनात केले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.