मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. सर्वसामान्य जनतेपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. बुधवारी, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मनसे नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी भेट दिली.
अशातच, गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यादरम्यान, एकनाथ शिंदेंनी असे विधान केले आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन सस्पेन्स निर्माण झाला आहे.
?दादर, #मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपस्थित राहून आज श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. आम्ही दरवर्षी राज ठाकरे यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येतो.… pic.twitter.com/yJNMw8JLBl — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 28, 2025
आमच्यात जी चर्चा झाली ती…
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘राज की बात राजही रहने दो’. पुढे शिंदें म्हणाले की, ‘आमची चर्चा खाजगी राहू द्या. काही लोकांना आता स्नेहसंबंध आठवले आहे, मात्र आमचा स्नेह आधीपासूनच आहे’, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी लगावला. ‘आमच्यात स्नेह असल्याने भोजनही लवकरच होईल’, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.