पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

मुंबई, ९ मे २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर इम्रान यांना अटक झाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

पाकिस्तानी रेंजर्सने मगंळवारी इम्रान यांना अटक केली आहे. इम्रान खान यांच्या पक्षनेते मुसरत चीमा यांनी ट्वीट करत सुरक्षा अधिकाऱ्याने इम्रान खान यांचा छळ करुन त्यांना मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांचे वकील जखमी झालेले दिसत आहेत.

न्यायालयात दाखल होण्याआधीच इम्रान खान यांना अटक करण्यात आले आहे. इम्रान यांना अटक करताना न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे इम्रान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. इम्रान खान समर्थक आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी इम्रान समर्थकांकडून जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे समर्थकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version