…म्हणून बुलडाण्यात माजी राज्यमंत्र्यांच विहीरीत उतरून आंदोलन

…म्हणून बुलडाण्यात माजी राज्यमंत्र्यांच विहीरीत उतरून आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना झाल्या असून, एका-एका गावात चार-चार पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. पण गावांना प्यायला पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. मा. राज्यमंत्री मंत्री सुबोध सावजींचा विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू  पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाईची मागणी केली.

बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाले असल्याच समोर आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी तसेच, २४० गावांतील योजनांचे ऑडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण ?

बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना झाल्या असून, एका-एका गावात चार-चार पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. पण गावांना प्यायला पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावांपैकी २४० गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी ऑडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीअंतर्गतविहीरीत बसून ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरू केले होते.

७३ वर्षीय माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे विहीरीत बैलगाडीच्या पाळण्याद्वारे उतरले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हे पाऊल उचलले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version