कोरोना मधून आता कुठे तरी आपण सुटलो असा विचर करत असतानाच देशात H3N2 या नव्या विषाणूचे संकट निर्माण झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात H3N2 ची लागण झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. H3N2 बाधित एका 23 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे.
सदर तरुण हा मूळचा औरंगाबाद येथील असून तो अहमदनगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. मागील आठवड्यात तो कोकणात फिरायला गेला होता. त्यानंतरच तो आजारी पडला होता. त्याला ताप, खोकला आणि सर्दी अशी काही लक्षणे आढळून आली होती. सर्वप्रथम त्याची कोरोना चाचणी केली त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याची H3N2 टेस्ट केली असता त्यामध्येही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
त्याच्यावर नगर शहरातील एका मोठया रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा पहिला संशयित बळी असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. देशात आत्तापर्यन्त या विषाणूमुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु आता या विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव केल्यामुळे पुन्हा एकदा संकटाचे ढग डोकयावर दिसत आहेत.
H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणू देशात वेगाने पसरतोय. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या २३ वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.