वृत्तसंस्था, दिल्ली
क्रोएशियाने यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदवताना बलाढ्य अर्जेंटिनाला ३-० असे नमविले. निझनी नोवगोरोद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाच्या तुफानी वादळाला सामोरे जावे लागले.
अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाची बचावफळी सपशेल अपयशी ठरली.
या अनपेक्षित पराभवासह जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाच्या बाद फेरीच्या आशा खूप धुसर झाल्या आहेत. या शानदार विजयासह क्रोएशियाने यंदाच्या विश्वचषकात बाद फेरी गाठणारा चौथा संघ म्हणून मान मिळवला.
Simply incredible from #CRO as they seal their place in the knock-out stages with a historic victory! Take a bow, @HNS_CFF ???#ARGCRO pic.twitter.com/pW9hyQGCAa — FIFA World Cup ? (@FIFAWorldCup) June 21, 2018
#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी
#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..
#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.