Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी; प्रशासनात खळबळ

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. तुकाराम मुंढेंच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे स्वागत होत असतानाच, एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी; प्रशासनात खळबळ

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध गुटखा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांवर कारवायांचा धडाका लावला आहे. मुंढे यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असतानाच, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुकाराम मुंढे यांना परभणीच्या पालक सचिवपदावरून हटवण्यात आले असून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

तुकाराम मुंढे हे मंत्रालयात दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असताना त्यांच्याकडे 23 फेब्रुवारी 2026 रोजी परभणीच्या पालक सचिवपदाची जबाबदारी देण्यात होती. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सध्या राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव आहेत.

हेही वाचा- MLC BJP Strength : विधान परिषदेत भाजपच 'किंग'; बहुमताचा आकडा पार करण्यासाठी मित्रपक्षांचीही गरज उरणार नाही!

मात्र आता तुकाराम मुंढे हे सचिव नसल्यामुळे त्यांच्याकडे असलेली पालक सचिवपदाची जबाबदारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर आले, त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य लोकांमधून कौतुक केलं जात आहे. 

नुकतीच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 7 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला आहे. मालवाहू वाहनातून गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या पथकाने तेल्हारा पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. यावेळी गुटख्यासह वाहन असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बाला जयस्वाल याला अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version