साई चरणी कोट्यावधीचे दान

गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी कोट्यावधीचे दान पडले आहे. गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात तब्बल ६ कोटी २६ लाख रुपयांचे दान पडले आहे. 
साई चरणी कोट्यावधीचे दान

२३ जुलै, २०२४ शिर्डी : गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी कोट्यावधीचे दान पडले आहे. गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात तब्बल ६ कोटी २६ लाख रुपयांचे दान पडले आहे. 
२० जुलै ते २२ जुलै दरम्यान आलेल्या २ लाखाहून अधिक भाविकांनी भरभरून दान केले आहे. दक्षिणा पेटी, देणगी काऊंटर, ऑनलाईन, चेक/डीडी, मनिऑर्डर, डेबीट- क्रेडीट कार्ड, सोने ,चांदी अशा सर्व माध्यमातून भरभरून दान करण्यात आले आहे. तसेच, या तीन दिवसात २०५ भाविकांनी रक्तदानही केले आहे.
शिर्डीच्या साईमंदिरात सुरू असलेल्या तीन दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सावाची सोमवारी सांगता झाली. गुरुपौर्णिमा उत्सवा दरम्यान, लाखो साईभक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. या उत्सवादरम्यान साई चरणी कोट्यावधीचे दान करण्यात आलं आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version