औरंगाबादमध्ये खास सोय, ‘थंडा-थंडा,कूल-कूल’

औरंगाबादमध्ये खास सोय, ‘थंडा-थंडा,कूल-कूल’

जय महाराष्ट्र न्युज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये उन्हाचा पारा ४२ डिग्रीवर जाऊन पोहचल्यानंतर माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यामुळेच सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आता वाघांना रोज आंघोळ घालणं सुरु केलं आहे. इतकचं नाही तर थंडा-थंडा,कुल-कुल राहण्यासाठी कुलर आणि वाॅटर स्प्रिंकलरही लावण्यात आलेत. यावर्षी उन्हाच्या पाऱ्याने उच्चांकी वाटचाल सुरु केल्यानं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघांसह इतर प्राण्यांनाही अशी सुविधा करण्यात आली आहे.  

विशेषतः वाघांना उद्यानातील कर्मचारी दिवसातून तीन वेळेस आंघोळ घालून त्यांची उन्हाची तीव्रता कमी करण्याच काम करत आहेत. सध्या सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या 9 इतकी आहे. या वाघांना उन्हाळ्यात कोणताही त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. वाघांबरोबर हरणांसाठीही स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत. तर नील गाईंसाठी ओला चिखल करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version