CM Devendra Fadnavis : महिलांना गोळ्या दिल्या, गर्भपात केला! मुख्यमंत्र्यांनी खरातच्या गुन्ह्यांचा पाढा वाचला, सांगितल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले.
CM Devendra Fadnavis : महिलांना गोळ्या दिल्या, गर्भपात केला! मुख्यमंत्र्यांनी खरातच्या गुन्ह्यांचा पाढा वाचला, सांगितल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना

मुंबई : सध्या राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या प्रकरणावर राजकारण तापले असतानाचा आज, मंगळवारी विधानसभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले. यावेळी माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोपी दिनेश परब याला अंतरिम जामीन मिळालेला आहे. शिर्डी येथे एका महिलेने तक्रार केली की, तिचा फोटो व्हायरल केला, तिला धमकी देण्यात आली. यानंतर नीरज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक खरात याने भोंदूगिरी केली. अशोक खरात पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी लुकआऊट नोटीस देत त्याच्या परदेशी जाण्याला बंदी आणली. अशोक खरात याने महिलेला तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला, अशी तक्रार महिलेने दिली. या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. आरोपीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. सर्व डेटा ताब्यात घेण्यात आला आहे. कुणीही महिला तक्रार द्यायला तयार नव्हती. मात्र महिलांचे समुपदेशन करण्यात आले आणि सुरक्षेची हमी देऊन तक्रार देण्यास भाग पाडले. व्हिडीओ बंद करण्यात आले आहे. आरोपीची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे ही माहिती घेण्यात आली आहे. तालुका सिन्नर येथे 10 एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यात आली. 40 कोटी 87 लाख रुपये बाजार मूल्य आहे. सोशल मीडियावर आलेले महिलांचे व्हिडीओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 

हेही वाचा : Ashok Kharat Case : पहिल्याच सुनावणीत धक्कादायक खुलासे! हरणाची शिकार, वाघ-सापाचा वापर, 5 नरबळी?, 21 जीवंत..

आरोपीच्या चौकशीनंतर त्याच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. मिरगावत 33 एकर जमीन, फार्महाऊस, सिन्नर 6 एकर जमीन, शिर्डीत 6 एकर जमीन, ओझरला 4 गुंठ्याचे 3 प्लॉट, अशोक खरात याच्या इतर प्रॉपर्टीची चौकशी करण्यात येत आहे. पीडित महिलेचा जवाब नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहे. पाच पीडित महिलांचे जवाब नोंदवण्यात आले. खरातच्या मालमत्तेबाबत अतिरिक्त माहिती घेतली जात आहे. काही वरिष्ठ अधिकारी जर यात सहभागी असतील तर माहिती घेऊन चौकशी केली जात आहे. त्यांच्या संस्थानची आणि संस्थेवरील संचालकांची चौकशी केली जात आहे. खरातच्या सोबतच्या सर्वांचे जवाब नोंदवले जात आहेत. व्हिडीओ देणाऱ्या सर्वांचे जवाब नोंदवण्यात आले आहे. एसआयटी तपासातून पीडित महिलांची चौकशी केली आहे. 4 पीडित महिलांचे जवाब नोंदवून गुन्हे नोंद करण्यात आले असून खरातवर आतापर्यंत एकूण 5 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक खरात याने पीडित महिलेला द्रव्य दिले होते. जादू टोना यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू झालेल्या प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्यावर कोप होईल, असे महिलेला सांगितले. मी देवाचा अवतार आहे, मी तुझ्याशी संबंध केल्यावर तुझे कल्याण होईल, असे या बाबाने सांगितले. या तपासात पेन डाईव्हमध्ये जे काय ते कैद आहे. आरोपीचे आर्थिक व्यवहार तपासून कारवाई सुरू आहे. अशोक खरातला जर कुणी मदत केली असेल तर त्यांचीही चौकशी होईल. या संपूर्ण प्रकरणात 8 गुन्हे दाखल आहेत. 7 गुन्हे एसआयटीकडे देण्यात आले आहेत. आतापर्यंत तपासाचे निवेदन आहे. ज्या ज्या व्यक्तींशी संबध असेल त्याची चौकशी होईल. कुणी मदत केली असेल त्याला आम्ही धडा शिकवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version