Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेचा कहर! या जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक 41.4°C तापमानाची नोंद; तर विदर्भातही उष्णतेच्या लाटा

Maharashtra Heat Wave : राज्यात उष्णतेचा कहर! या जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक 41.4°C तापमानाची नोंद; तर विदर्भातही उष्णतेच्या लाटा

छत्रपती संभाजीनगर: शहर परिसरात तीन दिवसांपासून तापमानाचा रोज उच्चांक होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी कमाल तापमान 41.4 अंश सेल्सिअसवर होते. तर किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअसवर होते. दिवसभर कडाक्याच्या उन्हामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होती. रविवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी कमाल तापमानाचा पारा 41.2 अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. मंगळवारी तापमानातील वाढ कायम राहिली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान असून, पुढील चार दिवसांत या आकड्यांचाही विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Nashik Crime News : नाशिक हादरलं! भररस्त्यात शिवसेनेच्या विभागप्रमुखावर कोयत्यानं सपासप वार; हल्ल्यात पदाधिकारी गंभीर जखमी

अवकाळीचा इशारा, तीन दिवस ऑरेंज-यलो अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असताना छत्रपती संभाजीनगरकरांना आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात 15 आणि 16 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 17 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात अवकाळी पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूरात उष्णतेची लाट 

विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतरचा गारवा संपला. दोन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांचा थंड पेयांकडे कल, रसवंती व लस्सी दुकानांवर गर्दी कूलर आणि एसीची मागणी वाढ. पुढील तीन-चार दिवसपर्यंत वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने घराबाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version