राज्यातील सगळ्याच खात्यांच्या निधीत 30% कपात – चंद्रकांत पाटील

राज्यातील सगळ्याच खात्यांच्या निधीत 30% कपात – चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. यातून राज्यावर आर्थिक ताण पडल्याचे संकेत मिळतायंत. परिणामी, राज्यातल्या सगळ्याच खात्यांच्या निधीत 30 टक्के कपात करण्यात आल्याचं परिपत्रक काढण्यात आलं.

अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलीय. या कपातीमुळे जिल्ह्याच्या विकासनिधीतही कपात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली असल्यामुळे ताण असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version